आज पुन्हा झोप येत नव्हती.. Diary काढून मी पान चाळली.. मोडक्या हातानी लिहिता येणार नाही म्हणून हताश होऊन.. फक्त पानच चाळत होते..
हळू-हळू ते प्रत्येक पान उलगडू लागलं.. त्याच्यासोबत मला आठवणीत खेचू लागलं..
चुरगळलेली पानं आज पुन्हा बोलू लागली..
काही मनात हसू लागली,
काही आणि दुमडून रडू लागली,
काही पानात दडपलेल्या गूढ रात्री उजळून आल्या,
काही पानात काही रात्री निजून राहिल्या..
एका पानावरची पहाट आपला सुगंध दरवळून गेली..
अचानक एका पानातली लाट सारी पानं पुन्हा चूरगळून गेली..
Awesome...!!!
ReplyDeletethnku :)
ReplyDelete