एकटीच..


मला जपणाऱ्या माझ्या माणसांच्या गराड्यात पण मला एकता वाटत,
वेडं मन माझा तुलाच कुठे तरी शोधत राहत..
आईच्या कुशीत तुझ्या मिठीची उब शोधून पाहीली,
पप्पांच्या नजरेत तुझी ओढ शोधून पाहीली..
मित्रांचे विनोद आज मला पाहून हसू लागलेत,
मी हसले कि सखी चे डोळे नकळत भिजू लागलेत..
माझ्या माणसांच्या असण्यात तुझा नसणं जाणवत नाही असा नाही,
नवीन आयुष्य जगताना तुझ्या आठवणींना नको म्हटलं तरी मिटवता येत नाही..
पण..
तुझं नसणं खरं तर तुझ्या असण्याहून आणि सुखद वाटत ,
आठवणीत निदान चांगला-वाईट माझा मला ठरवता येतं..

1 comment:

  1. सोबत होती आठवण...
    सोबत आहे आठवण...
    सोबतीचीच तर गरज होती....
    तीच पूर्ण करत असावी त्याची आठवण ...

    ReplyDelete