एकदा असाच..


नुकतच College संपल. आता कायमची सुट्टी! एक वेगळंच समाधान वाटत होतं. उद्या घरी जायला निघायचा म्हणून काय काय shopping & packing करायची ह्या विचारात रात्री केव्हा झोप लागली कळलंच नाही.
सकाळ झाली.. आज खर तर घरी जायचं म्हणून मी खूप खुश व्हायला हव होतं पण तरी एक रितेपणा जाणवत होता. काय झाला होता? ह्या विचारात मी घरातून बाहेर पडले.
बाहेर एक सुरेख सकाळ हळू हळू उमलत होती. सूर्य अलवार आकाशात डोकावत होता.. उंचच उंच वाढलेल्या माडाच्या झाडावर सोनेरी किरण पसरत होती.











पारिजातकाचा सडा पडलेला होता. लहान नाजूक फुलं ती...जपुन चालतानाही काही फुलं पायाखाली कोमेजलीच!
पलीकडच्या वळणावर बुचाची फुलं रस्ताभर विखुरली होती.. परसातली बुचाची पडणारी फुलं झेलण्याचा तो लहानपणीचा उद्योग आठवून हसू आल..
नेहमीच्या वाटेनी मी पुढे चालत जात होते. हळूहळू मन आठवणींची कवाड उघडून भूतकाळात उतरत होतं. नेहमीच्याच त्या चहाच्या टपरीवर नेहमीचीच वर्दळ. काही जण गरमा-गरम चहाचे भूरके घेत कालच्या क्रिकेटच्या सामान्यबद्दल चर्चा करत होते.. नुकताच, रोजचा morning walk संपवून आलेले गृहस्थ काखेतल वर्तमान पत्र सांभाळत, दुसरया हातातला चहाचा गरम पेला तोलत भ्रष्टाचारावर आपलं मत तावातावाने मांडत होते तर office ला वेळेत पोह्चायच्या घाईत एक तरुण गडबडीत चहा संपवत होता.. माझा चहा संपवून मीही निघाले.
रोज हे सगळं असच असतं..पण मग आज एक अनामिक हूर-हूर का?
परतीच्या वाटेवर हे कोड हळू-हळू उलगडू लागलं..
'ये चल उठ आत्ता' असा म्हणून मला रोज सकाळी उठवणारी माझी Dear Roomie आज नव्हती.. रोज कामाला जाण्याआधी प्राजक्ताची फुलं अलगद उचलून सजवणारी ती विद्या कालच तिच्या गावी गेली होती.. माडाच्या झाडावर अलवार पसरणाऱ्या सोनेरी किरणांना आपल्या क्यामेरयात टिपणारा राज आज नव्हता..गप्पात रंग भरणारा गट्टू, खळ-खळून हसणारी धनु, नेहमी उशिराने येणारा दीप..कुणी कुणी आज नव्हत.. चहाच्या टपरीवरच्या वर्दळीत मी आज एकटीच होते..
बुचाच्या फुलांनी दिलेल्या आठवणीने गहिवरून आलेला मन मोकळा करायला आज ह्यातला कुणी सोबत नव्हत..पण खरच का त्यांच्या नसण्यानी इतका फरक पडतो???
त्या फुलानाही का आज हे रितेपण जाणवत असावं? किरणांना का त्या एकट वाटत नसाव?
आज सगळ्या गप्पा शांत होत्या..आणि आठवणी पण एकट्या होत्या..
पण म्हणून का फुलं उमलायची थांबली नाहीत न किरणांनी उजळण सोडून दिलंय..
आठवणी पण अलगद डोकावतच होत्या..आमच्या नाहीत पण कुणाच्या तरी गप्पा रंगतच होत्या..
माझ्या उदास चेहर्यावर पुन्हा हसू उमलत होता.. आणि IPOD वर नुकतच गान बदलल होतं..
'जिंदगी कैसी हे पहेली हाये,कभी तो हसाये..कभी ये रूलाये..'

3 comments:

  1. सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस.

    पाण्यापेक्षाही खळखळूण तुझ हसण आहे..

    फुलापेक्षाही नाजुक तुझ बोलण आहे..

    स्वपनांपेक्षा सुदंर तुझ दिसण आहे..

    पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे.......

    काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे..

    बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत...

    मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे...

    पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे.......

    सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली आहे..

    गुलाबांनी ही तुझ्या ओठावरची गुलाबी चोरली आहे..

    तुझ्या रुसण्या मध्ये तुझ्या रागवण्या मध्ये सुद्गा एक अदा आहे

    तुझ्या ह्याच सर्व गोष्ठी वर तर मी फिदा आहे..

    सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर .......... तु नक्किच आहेस....

    पण.............पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे......

    ReplyDelete
  2. खरच खूप छान...मस्त आहे वाक्य रचना... मला हि आसा अनुभव आलेला आहे.. सर्व त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या :)

    --Sandy
    http://www.sandykadam.com/category/poems/

    ReplyDelete