मनातल पुन्हा नव्यानी सांगू लागतात,
मनात दडलेली गुपित,
एकट्यानीच रचलेले मनसुबे,
स्वप्नात बनवलेले इमले, पुन्हा दिसू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
कधी एकट्यानीच केलेली पायपीट,
कधी स्वतःशीच केलेली हितगुज,
स्वतःच स्वतः विरुद्ध मांडलेल्या बुद्धिबळात,
प्यादी मात देऊ लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
आयुष्याची मांडलेली गणित,
फिसकटलेले आपलेच डाव,
सुख-दुखाचे हिशोब नकळत चुकू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
ReplyDeleteमनात लपलेल्या मनाला त्या जागवू लागतात...
कोणताही विषय काढून न थांबता बोलू लागतात...
माझ्यातल्या ‘तू’ला माझ्याचसमोर मांडू लागतात...
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
हृदयावरचे घाव, भळभळणारी जखम,सगळे बाजुला सारून...
‘तुझे अन् माझे’, “आपले” क्षण शोधून जखमेवर फुंकर घालू लागतात...
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
काही न सुटलेले प्रश्न सोडवू लागतात...
प्रश्नातच दडलेलं उत्तरं समोर आणून ठेवतात...
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
तुझ्याविषयावर बोलत राहतात, बोलतच राहतात...
तू स्वप्नात भेटशील आठवल्यावर, या रात्री अंथरून पांघरून झोपी जातात...
SDC
नशीब तुझ, तुला केवळ स्वप्नांनीच फसवलय
ReplyDeleteमाझ तर आयुष्याच
फसवं निघालाय
रडत होतो प्रत्येक क्षणी
आता तर दु:खानेच मला हसायला शिकवलंय