हे बरय तुझ..



हे बरय तुझ...
मी रोज रात्री तुझ्यासाठी जागायचं,
अन 'सकाळी लवकर उठायचय' म्हणून तू खुशाल लवकर झोपायचं???
हे बरय तुझ...
तुला कधी दुखलं कि मी चिंतेने मर-मर मरायचं...
अन 'उगाच चिंता करते तू' म्हणत तू मलाच हिणवायचं???
हे बरय तुझ...
तुला काय आवडत ते मी नेहमी लक्षात ठेवायचं...
अन मला काय हवंय ते तू चुकून पण नाही विचारायचं???
हे बरय तुझ...
तुझी वाट पाहत मी तासन तास बसायचं...
अन 'वेळ नाही मला' म्हणत तू स्वप्नात पण नाही यायचं??? 

5 comments:

  1. मी तरी काय करू तूच सांग???
    तू आहेस जागी म्हणूनच झोपू शकतो...
    तुझीच तर साथ आहे, ज्यामुळे मी जगू शकतो...

    मी तरी काय करू तूच सांग???
    तुला चिंतेत पाहन जमत नाही मला...
    सांगू कस न हिणवता, हे पण तर समजत नाही मला...

    मी तरी काय करू तूच सांग???
    माझी लहान सहन आवडही लक्षात ठेवते तू...
    पण तू मला किती आवडते हे बर विसरते तू...
    तुला न विचारताच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मी,
    त्यामुळेच तर नेहमीच तुला निरखून बघतोय मी...

    मी तरी काय करू तूच सांग???
    स्वप्नात तू भेटलीस तर स्वप्नातून उठावास वाटणार नाही...
    आणि झोपून राहून तुला सत्यात मिळवण मला कादापि जमणार नाही...
    म्हणूनच वेळ नाही मला अस कारण तुला सांगतो...
    तुला न मला एकत्र आणणारा पूल, त्यावेळेत मी बांधतो...
    मी तरी काय करू तूच सांग???
    तू & मी, आपण हे स्वप्नावर तर मी जगत आहे...
    अन तेच सत्यात आणण्यासाठी मी असा वागत आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. loved it.........!!!!!! both of the poem...the reply is ausum haa

      Delete
  2. फारच छान ब्लॉग लिहिता तुम्ही !!!

    ReplyDelete
  3. blog udhan varyache..
    Bhushan Jijabrao Patil..

    ReplyDelete